पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असून, शहर पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधितांची वाढ होत असून, रविवारी (दि़२१ फेब्रुवारी) रोजी सन २०२१ मधील सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ही संख्या ६३४ इतकी आहे़. (covid cases increases rapidly in pune) रविवारी दिवसभरात पुणे शहरात ४ हजार ७०७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १३़४६ टक्के इतकी आहे़ शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारीही दररोज वाढत असून, १२ टक्क्यांपर्यंतही ही वाढ आता साडेतेरा टक्क्यांवर गेली़ तर सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ८९६ इतकी झाली आहे़
शहरात ९ मार्च,२०२० ला पहिला कोरोनाबाधित आढल्यानंतर, कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच गेला़ व मेच्या अखेरीस तथा जूनच्या पहिल्या आठवड्यात सहाशेच्या पुढे गेला़ नंतर सप्टेंबर मध्ये दोन हजारापर्यंत गेलेला ही कोरोनाबाधितांची संख्या हळू-हळू कमी होत जानेवारीत ९८ पर्यंत आली होती़ दरम्यान नागरिकांचा मास्कविना बिनधास्त वावर, फिजिकल डिस्टसिंगच्या नियमावलीची पायमल्ली व जागोजागी होणारी गर्दी यामुळे आजमितीला पुन्हा कोरोनाबाधितांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाºया कोरोनाबाधितांची संख्या ३५० वर गेली असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही १६४ इतकी झाली आहे़ दरम्यान आज दिवसभरात २९४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़
शहरात आजपर्यंत १० लाख ९९ हजार १३४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९७ हजार ९६४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार २४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८२६ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहराची स्थिती शहराचा पॉझिटिव्हिटी रेट गेल्या २१ दिवसांमध्ये दुप्पट झाला आहे. १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट ५.६५ टक्के इतका होता. १५-२१ फेब्रुवारीदरम्यान हा आकडा १०.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृत्यूदर मात्र १ टक्क्यांच्या खाली असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.शहरातील आठवडानिहाय कोरोना रूग्ण स्थिती -कालावधी चाचण्या कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट१-७ फेब्रुवारी २२, ५६४ १२७५ ५.६५८-१४ फेब्रुवारी २१,२४८ १८१६ ८.५४१५-२१ फेब्रुवारी २७,३१९ २९७० १०.८७