पुणे : शहरातील महापालिकेच्या ६० केंद्रांवर आज (शुक्रवार, दि. ११ जून) कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ याद्वारे कोविशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार असून, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी १४ मेपूर्वी घेतला आहे त्यांनाही नोंदणी करता येणार आहे़
कोविशिल्ड लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी ६० टक्के लस या ऑनलाईन अपॉईन्मेंट घेतलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ तर उर्वरित शिल्लक लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ नागरिकांना ऑनस्पॅट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाईल़ तसेच ८४ दिवसांपूर्वी (१९ मार्च पूर्वी) पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोसही आज उपलब्ध राहणार आहे़
-----
१४ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी १४ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन दस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़
------------------------