पुणे : शहरातील महापालिकेच्या १७६ केंद्रांवर सोमवारी (दि. २८) कोविशिल्ड, तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे ५ एप्रिलपूर्वी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना २० टक्के लस व ३० टक्के लस या अनुक्रमे पहिला डोस व दुसरा डोस म्हणून ऑनलाईन नोंदणी करून मिळणार आहे. तर २० टक्के लस दुसरा डोसकरिता व ३० टक्के लस या पहिला डोस म्हणून ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे.
----
३० मेपूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी ३० मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन द स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़
------------------------
महापालिकेच्या दवाखान्यात केवळ १८ ते ४४ वयोगटाला लस
महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ५८
रुग्णालयांमध्ये केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. याठिकाणी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळणार नाही. मात्र ही रुग्णालये वगळता इतर ११६ केंद्रांवर त्यांना ऑनलाईन व प्रत्यक्ष नोंदणी करून लस उपलब्ध राहणार आहे.