लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे ३० मार्च पूर्वी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना २० टक्के लस व ३० टक्के लस या पहिला डोस म्हणून नोंदणी करता येणार आहे. तर, २० टक्के लस दुसरा डोसकरिता व ३० टक्के लस या पहिला डोस म्हणून ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे.
----
२४ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी २४ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही़
------------------------