पुणे : शहरातील महापालिकेच्या ६१ केंद्रांवर आज (मंगळवार दि़ १३ जुलै) कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ४० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगव्दारे, तर २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे़
कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी २० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१९ एप्रिल पूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगव्दारे तर २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे़
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता आॅनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास आॅन स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस नागरिकांना देण्यात यावी अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत़
---------------------
दहा ठिकाणी दुसरा डोस उपलब्ध
शहरातील दहा सरकारी रूग्णालयांमध्ये आॅन दी स्पॉट नोंदणी करून ४५ वर्षांवरील नागरिकांना (१९ एप्रिल पूर्वी लस घेतलेल्यांना) उपलब्ध लसीच्या ५० टक्के लस दिली जाणार आहे़ तर उर्वरित ५० टक्के लस ही १८ ते ४४ वयोगटालाही आॅन दी स्पॉट नोंदणी करून उपलब्ध राहणार आहे़
------------------
सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस
शहरातील ससून हॉस्पिटलसह महापालिकेच्या प्रत्येक झोननिहाय पाच ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून, आॅनलाईन बुकिंगव्दारे २० टक्के लस ही १८ वर्षांपुढील नागरिकांना व २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे़ तर ६० टक्के लस ही १४ जूनपूर्वी व २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दिली जाणार आहे़ यामध्येही ४० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगव्दारे व २० टक्के लस ही आॅन दी स्पॉट नोंदणीव्दारे दिली जाणार आहे़
----------------------------------