परिंचे : परिंचे परिसरात गुरुवारी दुपारी (दि. २१) रोजी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून नवलेवाडी येथे गायीचा मृत्यू झाला. नवलेवाडी येथील शेतकरी नानासो मारुती वाघोले हे दुपारी आपल्या वडीलांसह शेतात कुळवणीचे काम करत होते. दुपारच्या वेळी जोरदार वादळ सुरू झाले. पावसाचा अंदाज घेऊन औताला जुंपलेले बैल सोडून गोठ्यात नेत असताना वीजांचा कडकडाट झाला. यावेळी वीज अंगावर पडून गायीचा जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज एवढा भयानक होता की परिसरातील जनावरे व शेतात काम करणारे शेतकरी घाबरले. या घटनेत त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. सदर घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाठी प्रमोद झुरंगे यांनी केला असून वाल्ह्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी गाईचे शवविच्छेदन केले. नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असल्याचे वाघोले यांनी केली आहे.
परिंचे येथे वीज पडून गायीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:39 PM