लोकमत न्यूज नेटवर्कयवत : पिकअप गाडीतून दाटीवाटीने कत्तल करण्यासाठी चार गार्इंना घेऊन जात असताना गो-संवर्धक कार्यकर्त्यांनी पकडून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यवत पोलिसांनी तीन आरोपी विरुद्ध प्राणी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतील फिर्यादी रसिका प्रकाश वरुडकर (वय २० रा. यवत ता. दौंड) यांना याबाबत माहिती मिळाली होती. दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथून काही गाया कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. ही माहिती त्यांनी त्यांचे सहकाऱ्यांना दिली. तसेच त्यांनी लडकतवाडी येथे दोन गाय व दोन वासरे दाटीवाटीने एका पिकअप जीपमध्ये (एम. एच. १६ क्यू. ६६०५) खुटबाव मार्गे घेऊन जात असताना केडगाव-चौफुला येथील टोलनाका परिसरात पकडला असता चालक हा गाडी सोडून पळून गेला. यानंतर या कार्यकर्त्यांनी हा गायींनी भरलेला पिकअप यवत पोलीस ठाण्यात आणला. यवत पोलिसांनी अज्ञात वाहन चालक, गाडीचा मालक आशिफ कुरेशी (रा. दौंड शहर) आणि या व्यवहारातील दलाल रामभाऊ झुंबर घाडगे (रा. अवचट वस्ती, यवत, ता.दौंड) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन आरोपी घाडगे यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार शशिकांत वाघ करीत आहेत.
कत्तल करण्यासाठी गाय नेणाऱ्यांना अटक
By admin | Published: June 24, 2017 5:35 AM