पुणे : मतदान सुरु होते, पोलीस आयुक्त शहरातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलची रिंग वाजते. त्यावर एक महिलाकाँस्टेबल बोलत असते. एका महिला कॉन्स्टेबलचा फोन पाहून तेही थोडेसे चपापतात. जयहिंद सर, मी बरोबर केले की चुक केले ? असे प्रश्न विचारते.तिचे म्हणणे ऐकल्यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नियम हे सर्वांना सारखेच असतात. तुम्ही बरोबर केले असे सांगून नियम काटेकोरपाळल्याबद्दल तिचे अभिनंदन करतात. ही घटना सोमवारी (दि. २१) दुपारी घडली.याबाबत या महिला पोलीस शिपायांनी सांगितले की, परिमंडळ एक मधील एका बुथवरबंदोबस्तासाठी माझी नेमणूक होती. आम्हाला सर्व नियम समजावून सांगितल.तसेच प्रशिक्षणही दिले होते. सध्या सत्ताधारी असलेले व पक्षात पदाधिकारी असलेल्या एक लोकप्रिय व्यक्ती तसेच महिला उमेदवार आपल्या १० ते १५ साथीदारांसह या ठिकाणच्या बुथवर येत होत्या. त्याच्याबरोबर महिलाही होत्या. उमेदवार असले तरी मतदान सुरु असताना त्यांना बुथमध्ये जाता येत नाही. त्या अगोदर एका बुथमध्ये जाऊन आल्यानंतर माझ्या बुथवर येत होत्या. मी त्यांना अडविले. तुम्हाला अशाप्रकारे ग्रुपने बुथमध्ये जाता येणारनाही, असे सांगितले. त्यावरुन त्यांनी रागावल्या. मी सुरक्षा रक्षकांनाबोलावले. तेव्हा त्यांच्या बरोबरच्या महिला माझ्या अंगावर आल्या. तुम्ही कोणाशी बोलता माहिती आहे का अशी अरेरावी करु लागल्या. पण मी हटले नाही.त्यानंतर सुरक्षा रक्षकांना यांना बाहेर काढा, असे सांगितले. तेव्हात्यांनी माझे नाव, बक्कल नंबर घेतला व मी सी पी साहेबांना भेटणार आहे.त्यांना तुझ्याविषयी सांगते, असे म्हणून त्यांनी मला वरिष्ठांची भिती घालण्याचा प्रयत्न केला. इतर पोलीस अधिकारी आल्यावर ते निघून गेले.त्यांनी वरिष्ठांना सांगणार असल्याचे म्हटल्याने मला पोलीस आयुक्तांविषयीखात्री होती, म्हणून मी स्वत: त्यांना फोन करुन ही माहिती दिली. त्यांनतुम्ही बरोबर केले. नियम सर्वांना सारखे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे या तेथे आल्या. त्यांनीही तुम्ही नियमानुसार काम केल्याने सांगून आमचा आत्मविश्वास वाढविला.
जयहिंद सर, मी बरोबर केले की चूक? महिला कॉन्स्टेबलने विचारला थेट प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:53 PM