पुणे : निविदा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही, असे आमचे पदाधिकारी म्हणत असतील तर ते बावळट आहेत, या भाजपाचेच सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या शाब्दिक हल्ल्याने भाजपाच्या शहर शाखेत वावटळ उठली आहे. महापालिका पदाधिकाºयांनी नो कॉमेंटस्् असे म्हणत चुप्पी साधली असली तरीही पक्षांतर्गत मात्र काकडे समर्थक व पालकमंत्री गिरीश बापट समर्थक असा वाद सुरू झाला असल्याचे दिसते आहे.स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ते आमचे नेते नाहीत, असे प्रत्युत्तर काकडे यांनी दिले असले तरी शुक्रवारी दिवसभर ते गायब होते. महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले या पदाधिकाºयांनी काकडे यांच्या टीकेवर काहीही बोलायचे नाही, असे स्पष्ट केले. महापौरांनी हा विषय आपल्यापुरता संपला आहे, असे सांगितले. वेगवेगळे विनोद करून भाजपा पदाधिकाºयांची खिल्ली उडवली जात होती. यावर जाहीरपणे बोलणे मात्र विरोधकांनीही टाळले.महापौरांबद्दल कोणाचीच तक्रार नाही, मात्र अन्य पदाधिकाºयांच्या विरोधात काकडे गटाचे एकत्रित येणे सुरू झाले आहे.त्यातही स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी काकडे यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य केल्यामुळे एकत्र येऊन भविष्यात त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
काकडेंच्या हल्ल्याने गटबाजी झाली उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:43 AM