शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

Pune: वीजचोरांना दणका, एकाच दिवशी ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड

By नितीन चौधरी | Published: November 09, 2023 3:02 PM

नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई तर कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.....

पुणे :महावितरणच्यापुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी १ हजार २५१ ठिकाणी ८२ लाख ४२ हजार रुपयांचा अनधिकृत वीजवापर होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ९९३ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. तसेच अनधिकृत वीजवापराचे २५८ प्रकार आढळून आले आहेत. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई तर कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.

महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवशी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले. त्यानुसार पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. ४) वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेत १ हजार २५१ ठिकाणी ८२ लाख ४२ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ५७८ ठिकाणी ४६ लाख १५ रुपये, सातारा जिल्ह्यात ९२ ठिकाणी ७ लाख ३४ हजार, सोलापूर जिल्ह्यात २७४ ठिकाणी १३ लाख ३८ हजार, कोल्हापूर जिल्ह्यात ९८ ठिकाणी ६ लाख ७५ हजार आणि सांगली जिल्ह्यामध्ये २०९ ठिकाणी ८ लाख ८० हजार रुपयांचा अनधिकृत वीजवापर उघड झाला आहे.

वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे आदेश नाळे यांनी दिले आहेत.वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी केल्यास विद्युत अपघाताचा मोठा धोका असतो. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा व फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahavitaranमहावितरण