शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

‘फेसबुक’च्या वादातून हाणामारी

By admin | Published: March 27, 2017 3:33 AM

‘फेसबुक’ पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादामधून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह

पुणे : ‘फेसबुक’ पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादामधून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुखसागरनगरमध्ये घडली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. नगरसेवक वसंत मोरे (वय ४३, रा. कृष्णलीला निवास, कात्रज) यांच्या फिर्यादीवरुन रवी एकनाथ संकपाळ (वय ४४, रा. आनंदनगर सोसायटी, सुखसागरनगर), राजाभाऊ कदम, राहुल कामठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजाभाऊ कदम यांच्या पत्नी भाजपाच्या नगरसेविका आहेत. तर रवी संकपाळ यांच्या फिर्यादीवरून वसंत मोरे यांच्यासह बंडू सूर्यवंशी आणि मंगेश रासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे आणि त्यांचे मित्र सूर्यवंशी व रासकर हे सुखसागरनगर येथून जात होते. त्या वेळी त्यांनी संकपाळ यांना ‘तू विनाकारण माझ्या फेसबुकवर कमेंट का करीत असतोस’ अशी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या संकपाळ, कदम आणि कामठे यांनी त्यांना मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सूर्यवंशी व रासकर यांनाही मारहाण झाली.