शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

चंद्राचा डिजिटल मॅप तयार- डॉ. प्रकाश तुपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 3:21 AM

गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे.

पुणे : अमेरिकन जिआॅलॉजिकल सर्व्हे, नासा आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे. त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे. अमेरिकेततर्फे २०२४ मध्ये चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी याचा चांगलाच उपयोग करता येईल, असे ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास, जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांमधून प्राप्त माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून मॅप तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या ५१ व्या ल्यूनर प्लॅनेटरी सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅपची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिआॅलॉजिकल सर्व्हेचे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.डॉ. तुपे म्हणाले, चंद्राच्या डिजिटल मॅपमध्ये चंद्राच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी विविध रंग वापरण्यात आले आहेत. त्यावरून चंद्राच्या निर्मितीच्यावेळी त्यावर असणारी माती आणि नंतर बदलत गेलेले चंद्राचे स्वरूप याबाबतची माहिती विविध रंगांच्या आधारे डिजिटल मॅप मध्ये दिली आहे. या मॅपच्या माध्यमातून चंद्रावर कोणत्या ठिकाणी उतरावे, चंद्रावरील कोणत्या ठिकाणी कोणता धातू सापडू शकतो हे समजू शकणार आहे. त्यामुळे चांद्रयान मोहिमांसाठी हा डिजिटल मॅप उपयुक्त ठरणार आहे.>सध्याचा मॅप कायमस्वरूपीचंद्रावर पाऊस, वारा अशा कुठल्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळेसध्या तयार करण्यात आलेला मॅप हा कायमस्वरूपी वापरला जाणार आहे. भारतालासुद्धा या मॅपच्या आधारे आपली चांद्रयान मोहीम यशस्वीरीत्या राबविता येऊ शकते, असेही तुपे यांनी सांगितले.