राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ या विज्ञान खेळणी आणि प्रकल्प ऑनलाइन प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी जावडेकर बोलत होते. यावेळी इंडियन केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबईचे माजी संचालक डॉ. ज्येष्ठराज जोशी, भारतीय विद्याभवन संस्थेच्या अध्यक्षा लीना मेहंदळे, संस्थेचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, पूर्वी विटीदांडू, लगोरी, भवरा यांसारखे मराठी खेळ खेळले जायचे. सध्याची पिढी मोबाइल आणि संगणकात अडकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी प्रयत्न करतात. तंत्रज्ञानामुळे आपण नव्या पिढीला आपली संस्कृती आणि मूल्यांची ओळख करून देऊ शकतो. मोबाइल आणि संगणकातील हिंसक खेळामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.