शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

क्रिकेटरसिकांची लागणार ‘कसोटी’

By admin | Published: January 21, 2016 1:01 AM

गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या ९ फेब्रुवारीला भारत -श्रीलंका हा या स्टेडियमवरील तिसरा टष्ट्वेंटी-२० सामना होत असून

किवळे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या ९ फेब्रुवारीला भारत -श्रीलंका हा या स्टेडियमवरील तिसरा टष्ट्वेंटी-२० सामना होत असून, २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रणजी करंडक अंतिम सामना होत आहे. त्यांनतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, आयपीएल सत्र नऊचे सामने होणार आहेत. किवळे ते गहुंजे या सेवा रस्त्याची दुतर्फा दुरवस्था झाली असल्याने दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. ते सामन्याच्या वेळी प्रेक्षकांची कसोटी पाहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अवघ्या २० दिवसांनी येथील स्टेडियमवर टष्ट्वेंटी-२० सामना होणार आहे. नंतर रणजी अंतिम सामना, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, आयपीएल सामने होणार असल्याने प्रेक्षकांना येताना व रात्री उशिरा किवळे- ते गहुंजे सेवा रस्त्याने जीव मुठीत धरून ये-जा करावी लागणार आहे. देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने सेवा रस्त्यावरील पुलाची व रस्त्याची अर्धवट कामे, कामाचा निकृष्ट दर्जा, वाहतुकीला होणारे रस्त्यातील अडथळे, रस्त्यावरील धोकादायक खड्डे, असुरक्षित बाजूपट्ट्या, विविध ठिकाणी खचलेला रस्ता, जलवाहिनीचे खोदलेले खोल चर, मार्गदर्शक व दिशादर्शक फलकांचा अभाव अशा समस्यांमुळे प्रत्येक सामन्याच्या वेळी हजारो प्रेक्षकांना तीन अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार असल्याचे रस्त्याच्या सद्य:स्थितीवरून दिसत आहे. सर्वच सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना किवळे ते गहुंजे सेवा रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे व दुरवस्थेमुळे अनेक प्रेक्षकांना त्याचा फटका बसला होता. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती . पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाशेजारून किवळे ते गहुंजे स्टेडियमपर्यंत दोन्ही बाजूंना बनविलेल्या सेवा रस्त्याची अर्धवट कामे तीन-चार वर्षांत पूर्ण झालेली नाहीत, अशी तक्रार वाहनचालकांतून होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आयपीएल सत्र पाच सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आधिपत्याखाली एका खासगी ठेकेदाराची सेवा रस्ता तीन महिन्यांत बांधण्यासाठी नेमणूक केली होती. या कामासाठी सोळा कोटी चाळीस लाख रुपये खर्च प्रस्तावित होता. आयपीएल सत्र पाचच्या सामन्यांसाठी रस्त्याची कामे अक्षरश: घाईघाईत ‘उरकण्यात’ आली असल्याचे बोलले जात होते. सामने संपल्यानंतरही अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामात दर्जा राखण्यात ठेकेदाराला अपयश आले आहे. महत्त्वाची कामे अद्यापही अर्धवट आहेत. काम पूर्ण करण्याची मुदतही कधीच संपली आहे. गहुंजे पुलाखाली बाजूंना रस्ता व्यवस्थित बनविला नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेकदा दुचाकी वाहने घसरत आहेत. किवळे, मामुर्डी व देहूरोड भागातून येणाऱ्या ओढे व नाल्यांवरील पुलाची कामे अर्धवट असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ता बनविताना बाजूपट्ट्या तयार केलेल्या नाहीत. त्या नसल्याने सामन्यांच्या वेळी व नंतरदेखील स्थानिक ग्रामस्थांचे अनेक अपघात झाले होते. सेवा रस्त्याच्या बाजूची झाडे-झुडपे विविध ठिकाणी काढण्यात न आल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. सर्वत्र पथदिवे बसविलेले नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. द्रुतगती महामार्गाच्या गहुंजेतील पुलाखालील वळण रस्त्यावर समोरून अचानक येणाऱ्या वाहनांचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तेथे रिफ्लेकटर, रेडियम पट्ट्या लावणे गरजेचे आहे. द्रुतगतीच्या पुलाशेजारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची मुख्य जलवाहिनी आडवी येते. रस्त्याला अवघड वळण देण्यात आलेले आहे. पवना जलवाहिनीचे काम बंद पडून चार वर्षे उलटले. ठेकेदाराने जलवाहिनीसाठी खोदलेले चर रस्त्यालगत असल्याने वाहनचालक नवखे असल्यास अंदाज न आल्यास थेट चरात पडण्याची शक्यता आहे. सेवा रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय योजण्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना दुर्लक्ष होत आहे. सामन्याच्या वेळी पुरेसे दिवे लावले जात नाहीत. (वार्ताहर)