पुणे : बांधकाम नकाशामध्ये मंजूर नसलेले प्रवेशद्वार बेकायदेशीर पद्धतीने बांधत असताना स्लॅब कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा मजूर जखमी झाल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक अशोक येनपुरे यांच्यासह सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. या स्लॅबसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी आरसीसी कन्सल्टंट अरुण नीलकंठ गोखले (वय ५०, रा. शेफालीका हाईटस, पौड रस्ता, शिवतीर्थनगर), आर्किटेक्ट मंदार वसंत केळकर (वय ४१, रा. शरयू बंगला, अरण्येश्वर), प्रयेजा सिटीचे बिल्डर संदीप नारायण जानी (वय ४८, रा. दामोदर रेसिडेन्सी, कोथरूड) नगरसेवक अशोक कोंडिबा येनपुरे (रा. शुक्रवार पेठ), विजय बंडुलाल भंडारी (वय ४८, रा. मार्केट यार्ड), गौतम माणिकचंद गिल्डा (वय ५१, रा. महर्षीनगर), प्रवीण कावेडिया (वय ५०, रा. मार्केट यार्ड), सुरेश पुनमिया (वय ५०, रा. रविवार पेठ), राजेश कोठारी (वय ५०, रा. मार्केट यार्ड), विनय बडेरा (वय ४२, रा. नारायण गाव), विनोद पगारिया (वय ६०, रा. मार्केट यार्ड), मंगेश कटारिया, विकास शहा (वय ५२, रा. मुकुंदनगर), जागामालक सचिन नथुराम वांजळे (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक), साईट सुपरवायजर सतेंद्र यादव, साईट इंजिनिअर विशाल तिखिले (वय ३५, रा. वाघोली), आरसीसी ठेकेदार सचिन शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार रस्तुम शेख यांनी फिर्याद दिली आहे. या दुर्घटनेत बांधकाम मजूर मोंटू जगदीश दास (वय ३०), झोंटू जगदीश दास (वय ३२), काजल बिलू धर (वय ३२), नरेश वसंत मंडल (वय ५०), महंमद मस्तारुल मंडल (वय २६), पुनीत मोहेश्वर मंडल (वय २०), रामल लक्ष्मण विश्वास (वय ३३), बटेश्वर गणेश मंडल (वय २५, सर्व रा. जाधवनगर, नांदेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नगरसेवकासह १७ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 15, 2015 6:08 AM