इंदापूर : नीरा डावा कालवा फाटा क्र. ९ मधील कालव्याचे पाणी दारे फोडून सायफन, मोटारीद्वारे चोरून शेतीला घेणाऱ्या रेडा, शेटफळ हवेली, काटी, वरकुटे खुर्द, लाखेवाडी गावांतील २८ शेतकऱ्यांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.विजय यादव, रामभाऊ यादव, संतोष राऊत, अशोक वाघमोडे, दिनकर वाघमोडे, छगन यादव, लाला उत्तम रूपनवर (सर्व रा. काटी), राजेंद्र देवकर, हनुमंत गायकवाड, जालिंदर देवकर (सर्व रा. रेडा), बलभीम सावंत, बाळू सावंत (सर्व रा. शेटफळ हवेली), संतोष राऊत, सुरेश भोंग, बाळू हरी गोरे, विनायक बोराटे, नवनाथ बोराटे, अण्णा वाघमोडे, गिरीश वाघमोडे, कैलास गोटे, शशिकांत गोटे, लखन गोरे (सर्व रा. काटी), भारत दोलतोडे, मारुती ठवरे, पोपट दगडे, पोपट देवकर, दिलीप मिसाळ , प्रदीप प्रभाकर खाडे अशी आरोपींची नावे आहेत.
पाणी चोरीप्रकरणी २८ शेतकऱ्यांवर गुन्हा
By admin | Published: March 31, 2017 2:39 AM