शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

फसवणूकप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: May 12, 2017 5:24 AM

सातारा शहर व जिल्ह्यातील १००हून अधिक जणांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील २ डॉक्टरांविरुद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : सातारा शहर व जिल्ह्यातील १००हून अधिक जणांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील २ डॉक्टरांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.डॉ. निरंजन वेताळ जाधव व डॉ. गणेश माने (दोघे रा. अ‍ॅमनोरा टाउनशिप, हडपसर) या दोघांवर फसवणूक व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हिंमत बाजीराव कणसे (वय ५२, रा. विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान ६ मे रोजी जाधव हे बेपत्ता झाल्याबाबातची तक्रार त्यांच्या पत्नने हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे. २०१६मध्ये डॉ. जाधव व डॉ. माने यांनी ओझेरिच नावाची पहिली कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून फर्निचर, जीन्स पँट, भांडी, लेगीन्स, साड््य व इतर साहित्य खरेदी-विक्रीच्या डील सुरू केल्या. तसेच या योजनेत ज्यांना गुंतवणूक करावयाची आहे, अशांनी १० हजार रुपये हडपसर येथील बँकेत जमा केल्यास ३ महिन्यांमध्ये साहित्य खरेदी न करता २० हजार रुपये मिळतील असे सांगितले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा त्यासाठी त्यांनी उपयोग करून घेतला. कंपनीकडून तुळशीचे बी देण्यास सुरुवात केली. त्यातून दर तीन महिन्याने वाढलेली तुळशीची रोपे डॉक्टर घेऊन जात व त्या बदल्यात भरघोस पैसे गुंतवणूकदारांना देत होते. त्यामुळे सातारा येथील तुळशीचे उत्पादन घेणाऱ्या लोकांचा कंपनीवर विश्वास बसला. त्यामुळे अनेकांनी या योजनेत गुंतवणूक केली. गुंतवणुकीचे पैसे डॉ. जाधव यांच्या खात्यावर लोकांनी भरले. सुरुवातीला या माध्यमातूनही काही लोकांना फायदा झाला. त्यामुळे मोठ्या रकमांची गुंतवणूक होत गेली. हा सर्व प्रकार सुरू असतानाच संशयित दोघांनी मार्च २०१७मध्ये दुसरी अमग्झ नावाची कंपनी काढली. या कंपनीचे सभासद होण्यासाठी २ लाख रुपयांचा शेअर व ट्रेनिंगसाठी ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. रक्कम भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला कंपनी ४४ हजार रुपये या प्रमाणे असे ६ महिने देणार होती. मात्र वेळेत कोणतेही पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पुढील तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अंजूमन बागवान करत आहेत.