शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

वृद्ध आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:33 AM

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : जेवण न देता करीत मानसिक छळ

पुणे : वंशाचा दिवा म्हातारपणाची काठी ठरेल अशी कुटुंबातील ज्येष्ठांना आशा असते. मात्र ही काठी वृद्ध आई-वडिलांच्याच पाठी पडत असून, त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून जन्मदात्यांचा छळ करीत आहेत. आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनीच उतारवयात अशी परतफेड केल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मुलांनी मदत करावी, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जावे लागत आहे.

मुलं संभाळ करीत नाहीत. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात म्हणून एका ९४ वर्षीय महिलेने मुलीच्या माध्यमातून थेट पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी सामाजिक बांधीलकी आणि शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वृद्ध मातेला न्याय मिळावा म्हणून तिच्या दोन मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित ज्येष्ठ महिला या दत्तवाडीतील लायन क्लब परिसरात राहायला आहे. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले होती. मुलीचे लग्न झाले असून मोठा मुलगा कोथरूड येथे राहतो, तर छोट्या मुलाचे निधन झाले आहे. त्याची पत्नी व तीन मुली पीडित महिलेबरोबर दत्तवाडीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली त्या नातीला घेऊन फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी एका हातगाडीचा धक्का लागून त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला होता. आॅपरेशन झाल्याने त्या सर्व वैयक्तिक विधी जागेवरच करत. त्यामुळे सून व नात या देखभाल न करता त्यांना शिवीगाळ करायच्या. तसेच त्यांना खायलाही वेळेवर न देता सारख्या ओरडत असत.कधीकधी अंगावर धावून येत व जीवे मारण्याच्या धमकी देत असत. या काळात मोठी नात व तिच्या पतीने घरातील इतरांच्या मदतीने त्यांना खोटी माहिती देत पीडितेच्या नावावर असलेले घर स्वत:च्या नावे बक्षीसपत्र करून त्यावर सह्या घेतल्या. त्यानंतर आता ते सर्व पीडित महिलेला घरात राहून देत नाही. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात. त्यामुळे त्या गेल्या १० महिन्यांपासून मुलीच्या घरी राहत आहेत. त्यामुळे त्यांची मुलगी आणि ज्येष्ठ नागरिक कक्षाने पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दत्तवाडी पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून वृद्ध आईला सांभाळण्यास सांगितले होते. मात्र कोणीही त्यांना सांभाळण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सामाजिक बांधीलकी व शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाला अनुसरून वृद्ध मातेला न्याय मिळावा यासाठी दोन्ही मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.पती होते सैन्यात जवानच्पीडित महिलेचे सैन्यात नोकरीस असणाºया जवानाशी लग्न झाले होते. नारायण पेठेत त्यांनी आपला संसार सुरू केला होता.च्मात्र पानशेत दुर्घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी पूरग्रस्तांना दत्तवाडीमध्ये जागा देण्यात आल्या होत्या.च्तेव्हापासून त्या पतीसोबत तिथे राहत. पतीचे १९९० साली निधन झाले आहे.

टॅग्स :Puneपुणे