दरम्यान , पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या मालकीचे हे लॉज असल्याने जुन्नर तालुक्यात खळबळ माजली आहे . हॉटेल चालक अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी , कैलास नामदेव वाबळे (रा. नारायणगाव , ता. जुन्नर) यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . फिर्याद पोलीस शिपाई योगेश गारगोटे यांनी दिली आहे.
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव एस टी बस स्थानकासमोरील हॉटेल विश्वनाथ लॉज येथे निगडी व आळंदी येथील महिलाना लॉजवर ठेवून चालक हा कैलास वाबळे या एजंटच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती सहयक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड याना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि ०२) दुपारी १२.३० वा. सुमारास बनावट ग्राहक पाठवून दिले असता लॉज चालकाने मुली आहे असे सांगितले . बनावट ग्राहकाने तिवारी याला १ हजार देऊन मुलींना घेऊन या असे सांगितले असता गुंड यांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला असता त्याठिकाणी निगडी येथील ३२ वर्षीय महिला व आळंदी येथील २६ वर्षीय दोन महिलांना ताब्यात घेऊन लॉज चालक तिवारी सह तीन जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे .यापुढील तपासात लॉज मालकावर कागदपत्रे तपासून गुन्हा दाखल करणे बाबत निर्णय घेण्यात येईल , अशी माहिती तपासी आधिकारी डि. के. गुंड यांनी दिली .