चाकण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी. यासाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. निवडणुकीचा काळ हा संवेदनशील असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व निवडणूक पूर्ण होईर्पयत चुकूनही आचार संहितेचा भंग होऊ नये. याकडे सर्वच पक्षांनी कटाक्षाने लक्ष द्यावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी येथे दिल्या.
चाकण पोलीस ठाण्यात काल (दि.17) सर्वपक्षीय प्रमुख पदाधिका:यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांनी याबाबत सक्त सूचना सर्वपक्षीय पदाधिका:यांना केल्या. पदाधिकारी व कार्यकत्र्यानी सोशल मीडियाला संयमाने हाताळण्याची गरज आहे. कुठल्याही स्थितीत कसलाही तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मजकूर कुणीही पसरवू नये, निवडणूक काळात फिरविण्यात येणा:या उमेदवारांच्या रथांची प्रथम परवानगी घ्यावी, निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठलीही आमिषे दाखविली जाऊ नयेत. मतदार आणि कार्यकत्र्याच्या भोजनावळी किंवा ठराविक हॉटेल, ढाब्यांवर मद्यपाटर्य़ा होण्याची शक्यता गृहीत धरून अशा प्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
निवडणुकी दरम्यान कुठल्याही व्यक्तीचा संशय आल्यास त्याची व त्याच्या वाहनाची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे.
बैठकीसाठी मनसेचे अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, गणोश प:हाड, मनोज खराबी, कॉँग्रेसचे कालिदास वाडेकर, भास्कर तुळवे, भाजपाचे अमृत शेवकरी, दिलीप वाळके, राष्ट्रवादीचे भगवान मेदनकर, राहुल नायकवाडी, आरपीआयचे संतोष जाधव, नितीन जगताप, राहुल गोतारणो, आदींसह पोलीस अधिकारी किशोर पाटील, खेडकर, मुंढे, प्रविणकुमार गोसावी व कमर्चारी उपस्थित होते.
(वार्ताहर)
4आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना पोलिसांनी काय करू नये. हे स्पष्ट केले. त्यामध्ये देऊळ, मशीद, चर्च आदी प्रार्थना स्थळांचा प्रचारासाठी वापर करू नये, मतदारांना लाच अथवा धाक दाखवू नये. मतदान केंद्रापासून 1क्क् मीटरच्या आत प्रचार करू नये, मतदारांची ने-आन करण्यासाठी वाहन वापरू नये, खाजगी इमारतींवर पोस्टर्स घोषणा लिहू नये, अन्य पक्षांच्या सभांमध्ये अडथळा आणू नये. अन्य सभांच्या ठिकाणी मिरवणुका आणू नयेत, वैयक्तिक व टोकाच्या टीका टिपण्या करू नयेत, घातक शस्त्न बाळगू नयेत, अशा अनेक सूचना करण्यात आलेल्या असून त्याचे काटेकोर पालन करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.