कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर (वय ४०) असे या घटनेत मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी दादाभाऊ मारुती वाघ (वय २६, रा. निमगाव दुडे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे अंजली कानिफनाथ पांढरकर (वय ३५, रा. खंडाळे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी: कानिफनाथ पांढरकर हे दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास फिर्यादीस शेतात सोडून त्यांच्याकडील मोटारसायकल घेऊन त्यांचा वाढदिवस असल्याने तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क केला. परंतु फोन बंद लागला. त्यानंतर दि. १६ ऑगस्ट रोजी खंडाळे गावचे पोलीस पाटील यांच्याकडून फिर्यादी यांना त्यांचे पती कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर हे न्हावरा - तळेगाव रोडलगत घाटाजवळ जखमी अवस्थेत पडलेले असल्याबाबत माहिती मिळाल्याने फिर्यादी यांनी समक्ष जाऊन पाहणी केली. कोणीतरी अज्ञात इसमाने जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून असता त्यांना जिवे ठार मारून ओळख पटू नये याकरिता पुरावा नष्ट केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीण, अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पो.हवा. मुकेश कदम यांचे तपास पथकाने कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्यावरून आरोपी दादाभाऊ मारुती वाघ याने त्याचे नात्यातील एका बालकाचे मदतीने केला असल्याची माहिती मिळाल्याने आरोपीस ढोकसांगवी येथे एका बिल्डिंगमध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक येळे, मुंडे व स्टाफचे मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
आरोपी दादाभाऊ मारुती वाघ याने त्याचे नात्यातील विधिसंघर्षित बालक याच्या मदतीने दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे कबूल केले आहे.