बारामती - २० हजार रुपयांचे दरमहा २० टक्के दराने दरमहा ४ हजार रुपये व्याज वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० हजार रुपये बेकायदा व्याजाने देऊन २० टक्के व्याजाने वसुली केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या डोर्लेवाडी येथील १५ जणांवर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय रघुनाथ गंधारे (वय ४२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी बेबट्या अज्या भेसले, अज्या भेसले, चैत्री अज्या भेसले, दत्या भोसले, विज्या भोसले, अकबºया भासेले, सागर भोसले, अश्विनी बेमट्या भोसले, सुनीता दत्या भोसले, मर्दानी अकबºया भोसले, पूजा सागर भोसले, पोर्णिमा विज्या भेसले, मीना अमोल काळे, करण जक्कल पवार, नीलम करण पवार (सर्व रा. झारगडवाडी, बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२० मार्च ते १९ सप्टेंबर २०१८ दुपारी २ वाजेपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलसमारे, फिर्यादीच्या घरात गुन्हा घडला. आरोपी बेबट्या भोसले, अज्या भोसले, चैत्री भोसले यांनी फिर्यादीस २० हजार रुपये दरमहा १० टक्के दराने बेकायदेशीर व्याजाने दिले. सर्व आरोपींनी फिर्यादीचे घरासमोर येऊन गोंधळ घालून १० टक्के ऐवजी २० टक्केप्रमाणे दरमहा ४००० घेतले. घराबाहेर येऊन फिर्यादी व फिर्यादीचे कुटुंबातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे करीत आहेत.फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादी, फिर्यादीचे घरातील लोकांना पकडून हाताने लाथांनी मारहाण केली. फिर्यादीचे शर्टच्या खिशातील ५००० रु., पॅन्टच्या उजव्या खिशातील फिर्यादीच्या दुचाकीची चावी व डाव्या खिशातील दुचाकीची कागदप़त्रे असे जबरदस्तीने घेऊन गेले.
२० हजारांंच्या कर्जाचे ४ हजार रुपये व्याज, बेकायदा सावकारी व्यवसायप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:30 AM