शहरं
Join us  
Trending Stories
1
"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला
2
सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण
3
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
4
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
5
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
6
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
7
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
8
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
9
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
10
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
11
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
12
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
13
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
14
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
15
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
16
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
17
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
18
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
19
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
20
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ  

By नितीश गोवंडे | Published: December 02, 2024 10:55 AM

आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली.

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील १८ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला. विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली.आंदेकर खून प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला. याप्रकरणात २२ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. आंदेकर खून प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह साथीदार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांची आहे. मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांपर्यंत वाढविता येते, असे सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितले.आंदेकर खून प्रकरणचा सखोल तपास करण्यात असल्याने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येत आहे, तसेच संघटित गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्ती, मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. खून प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रीकरण, आरोपींचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आरोपींची येरवडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे. साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे. सखोल तपासासाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून करण्यात आला. आंदेकर यांचे बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते.

कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती मिळाली. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने खून केला होता. त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाArrestअटक