शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 4:29 PM

आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसाच्या चुकीमुळे नियम पाळणाऱ्या नागरिकालाच झाला दंड

पुणे  : वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे ई-चलनाद्वारे एकाला आकारलेली दंडाची पावती दुसऱ्याच्या मोबाईलवर आल्याने वाहतुकीचे सर्व नियम पाळणाऱ्या एका नागरिकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दंड आकारणीमध्ये सुलभता यावी, यासाठी सुरु करण्यात आलेली ई-चलन प्रणाली वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरू लागल्याचे चित्र आहे.नऱ्हे येथे राहणारे सुरेश पिंगळे (वय ५४, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) यांच्या मोबाइलवर २२ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे वाहतूक पोलिसांचे ई-चलन प्राप्त झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्याने दोनशे रुपयांची दंड भरण्याबाबतचे त्यात नमूद होते. ही दंडाची पावती पाहून या नागरिकाला धक्काच बसला. आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला. अखेर पावतीसोबत पाठवलेल्या वाहनाचे छायाचित्र पाहिले असता हे वाहन आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. छायाचित्रातील वाहनाचा क्रमांक वेगळा होता. त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या चुकीचा उलगडा त्यांना झाला. वाहतूक पोलिसांच्या या प्रतापाबद्दल त्यांनी १०० नंबरला फोन करून कळविण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

......च् मी रोज कंपनीच्या बसने ऑफिसला जातो, त्यादिवशीही मी बसनेच ऑफिसला गेल्याने माझी करड्या रंगाची दुचाकी स्कूटर (क्रमांक एमएच १२ आरयू १७८७) ही दुचाकी सोसायटीच्या वाहनतळामध्ये उभी होती. असे असतानाही वाहतूक पोलिसांचे दंडासाठीचे आलेले ई-चलन पाहून मला धक्काच बसला, असे तक्रारदार सुरेश पिंगळे यांनी सांगितले. च् शहर वाहतूक पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता यावी, ऑनलाइन व्यवहारात वाढ व्हावी. तसेच दंड आकारण्यात सुलभता यावी यासाठी ई-चलन सेवा वापरात आली आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ऑनलाईन कारवाई केली जाते. वाहनाचे चित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो. 

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीस