पुणे: शहरात डेंग्यू, मलेरिया साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने कडक उपाययोजना करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात शहराच्या विविध भागात तपासणी करून ‘एडिस इजिप्त’ डासांच्या अळ्या आढळून आलेल्या व वारंवार नोटीसा देऊनही उत्पत्तीस्थळे नष्ट न करणा-यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले.दरवर्षी पावसाळ््यामध्ये शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजाराचा उद्रेक होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरामध्ये मोठ्या प्रणाणात ‘एडिस इजिप्त’ डासांच्या अळ्यांच्या उत्पत्तीस्थानांची तपासणी करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात जूनपासून आतापर्यंत शहरामध्ये तब्ब्ल दीड लाख घरांमध्ये उत्पत्तीस्थनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एडिस इजिप्त डासांच्या अळ्या आढळून आलेल्या तब्बल २८ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर २ हजार ४०० लोकांना नोटीसा देण्यात आल्या. यामध्ये वारंवार नोटीसा देऊन देखील ही उत्पत्तीस्थळे नष्ट न करणा-या १० ते १२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती, प्रभारी आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांनी दिली.----------------या लोकांवर झाले गुन्हे दाखलविरेद्र एस.कट्टी, बहिरट पाटील बिल्डींग, शिवाजीनगर, हेमंत रामचंद्र लोखडे, बोपदेव घाट, कोंढवा, कृष्णा बाबू सुर्वे, मार्केट यार्ड, डी.बी.रीयालटी बांधकाम, येरवडा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.-------------------डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी कोरडा दिवस पाळाघरात, घरालगतच्या परिसरात साठलेल्या किंवा सावलेल्या स्वच्छ पाण्यात ‘एडिस इजिप्ती’ हा डेंग्यू, मलेरिया साथीचा आजार पसरविणारे डासांची उत्पत्ती होते.साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे असे साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू, मलेरियावर नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरात आठवड्यातून एक दिवस तरी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
डेंग्यू डासाची उत्पत्तीस्थळे आढळलेल्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 8:57 PM
गेल्या दीड महिन्यात जूनपासून आतापर्यंत शहरामध्ये तब्ब्ल दीड लाख घरांमध्ये उत्पत्तीस्थनांची तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्देशहरात २ हजार ४०० नागरिकांना नोटीसा : २८ हजार जणांना दंड एडिस इजिप्त डासांच्या अळ्या आढळून आलेल्या तब्बल २८ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई वारंवार नोटीसा देऊन देखील ही उत्पत्तीस्थळे नष्ट न करणा-या १० ते १२ लोकांवर गुन्हे दाखल डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी कोरडा दिवस पाळा