कोेरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर ) येथील भावकीतील शेताच्या वादातून वाद न्यायालयात प्रलंबित असताना देखील उभ्या पिकाच्या शेतामध्ये पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये एका बाजूच्या सत्तावीस व दुसऱ्या बाजूच्या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अशोक दरेकर व अजित दरेकर यांची वडिलोपार्जित जमीन असून दोघांकडे देखील एकमेकांचे क्षेत्र वहिवाटीस आहे. त्यांच्यामध्ये २०१३ पासून न्यायालयात दावा दाखल आहे. परंतु १९ मे रोजी अजित हिरामन दरेकर यांच्यासह आदींनी अशोक दरेकर यांच्या शेतात पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरण्यास सुरवात केली. यावेळी अशोक दरेकर यांनी तेथे जात पाहणी केली असता त्यांना पंचवीस तीस जण तेथे असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी तेथे असलेल्या लोकांना शेतातील पिकांचे नुकसान करू नका अशी विनंती केली असता त्यांनी अशोक दरेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत हातपाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अशोक तुकाराम दरेकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजित हिरामण दरेकर, आशा सोमनाथ दरेकर, संगिता लालाराम दरेकर, शरद पठाण दरेकर, अरुण हिरामन दरेकर, भानुदास पठाण दरेकर, शामराव नामदेव दरेकर, राहुल शामराव दरेकर, पंकज शामराव दरेकर, कुसूम बाळासाहेब दरेकर आदी जणांवर (सर्व रा. सणसवाडी पाटीलवस्ती ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. पुष्पा भानुदास दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत पुष्पा दरेकर व त्यांच्या घरातील महिला शेतात काम व ट्रॅक्टर चालक नांगरणी करत असताना अशोक दरेकर, राजेंद्र दरेकर व विकास दरेकर हे हातामध्ये काठ्या व लोखंडी गज घेऊन त्याठिकाणी आले व त्यांनी ट्रॅक्टर चालकाला नांगरणी करायची नाही. ट्रॅक्टर बंद करा असा दम दिला त्यावेळी पुष्पा दरेकर व महिलांनी त्यांना तुम्ही असे का म्हणता हे शेत आमच्या मालकीचे आहे असे म्हटले असता त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करून महिलांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईन असे कृत्य केले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी अशोक तुकाराम दरेकर, राजेंद्र दत्तात्रय दरेकर, विकास सुदाम दरेकर (सर्व रा.सणसवाडी पाटील वस्ती ता. शिरूर जि. पुणे ) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.
सणसवाडीत जमिनीच्या वादातुन ३२ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 8:35 PM
भावकीतील शेताच्या वादातून वाद न्यायालयात प्रलंबित असताना देखील उभ्या पिकाच्या शेतामध्ये पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरून शिवीगाळ दमदाटी करण्यात आली.
ठळक मुद्दे२०१३ पासून न्यायालयात दावा दाखल