शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाखारी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, दोघे सराईत गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:09 AM

या प्रकरणी सागर उर्फ सोन्या जालिंधर सूर्यवंशी (वय २९, रा.केडगाव, पिसेवस्ती, ता.दौंड, जि.पुणे) व अमोल उर्फ लखन विलास देशमुख ...

या प्रकरणी सागर उर्फ सोन्या जालिंधर सूर्यवंशी (वय २९, रा.केडगाव, पिसेवस्ती, ता.दौंड, जि.पुणे) व अमोल उर्फ लखन विलास देशमुख (वय २९, रा.खंडोबानगर, ता.बारामती, जि.पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (११ मार्च) रोजी दुपारी २-३० वाजण्याच्या सुमारास, केडगाव चौफुलाजवळील वाखारी गावच्या हद्दीत कॅनॉलच्या कच्च्या रोडच्या कडेला सागर सूर्यवंशी व एका अनोळखी इसमाने रमेश श्यामजी कुछाडीया (वय ३६, रा.कोपरखैरणे, नवी मुंबई) यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चेन, उजवे मनगटावरील दोन तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मोबाइल, रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून चोरून नेला. त्यावेळी कुछडीया यांनी आरडाओरड केला असता, तेथे रस्त्याने जाणारे लोक आल्याने दोघे आरोपी पळून गेले होते. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाच्या असल्याने, गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड हे पथक पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात करत असताना, त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत दोन इसम हे पाटस येथे त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी येणार आहेत, अशी बातमी मिळाल्याने, लागलीच पथकाने वेशांतर करून त्या ठिकाणी सापळा रचला.

तेथे सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी दुचाकीवर येऊन उभ्या असलेल्या सागर सूर्यवंशी व लखन देशमुख या दोन संशयितांना हेरले, परंतु हे पूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने, पोलिसांना पाहून ते पळून जात असताना, पोलिसांनी त्यांच्याकडील वाहन त्यांच्या दुचाकीला आडवे लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे वाखारी येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील त्यांनी चोरलेल्या २ सोन्याच्या अंगठ्या, १ मोबाइल, रोख रक्कम ७ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व इतर १ मोबाइल असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा ऐवज मिळून आल्याने तो जप्त केलेला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये दोघा आरोपींनी सदरचा ऐवज वाखरी येथे एका इसमास मारहाण करून जबरदस्तीने लुटल्याचे सांगितले.

हे दोघे यापूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून, आरोपी सागर सूर्यवंशी याच्यावर यापूर्वी यवत व भिगवण पोलीस स्टेशनला ३ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर अमोल देशमुख याच्यावर यापूर्वी पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, दुखापत, चोऱ्या असे एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी केडगाव चौफुला, पाटस, कुरकुंभ, सोलापूर रोड येथे वाहन चालक व प्रवासी यांची लुटमार केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू असून, यामुळे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर परिसरात अशा प्रकारे कोणाची जबरदस्तीने लुटमार झाली असल्यास, यवत पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन घनवट यांनी केले आहे. जप्त केलेला मुद्देमाल व दोघे आरोपी यांना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.