पुणे : मुदतीत विवरणपत्र न भरणाऱ्या तसेच कर चुकविणाऱ्या जिल्ह्यातील ३३ व्यापाऱ्यांविरोधात नोव्हेंबर महिन्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विक्रीकर विभागाकडून देण्यात आली. विक्रीकर कायद्यानुसार व्यापाऱ्यांनी मासिक, त्रैमासिक अथवा सहामाही विवरणपत्रे भरणे बंधनकारक आहे. तसेच या विवरणपत्रासोबत कराचादेखील भरणा करणे आवश्यक असते. मुदतीत विवरणपत्र अथवा कराचा भरणा न केल्यास व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतरही त्यावर कार्यवाही न झाल्यास पोलीस कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विवरणपत्र व कर न भरलेल्या व्यापाऱ्यांनी त्वरित ही कार्यवाही करावी. तसेच ज्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद असतील, त्यांनी तत्काळ नोंदणी दाखला रद्द करण्यासाठी नोंदणी शाखा विक्रीकर भवन येरवडा येथे अर्ज करावा, असे आवाहन विक्रीकर सहआयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कर चुकविणा-या ३३ व्यापाऱ्यांवर गुन्हे
By admin | Published: December 04, 2014 4:54 AM