करंदी (ता. शिरूर) येथील विवाहिता मोनिका चंद्रावळे हिचा विवाह २०१६ मध्ये झालेला होता, लग्नानंतर काही दिवसांनी विवाहितेचा पती व सासू विवाहितेला माहेरहून शेतीच्या कामासाठी पैसे आणण्यासाठी छळ होत होता. विवाहितेच्या वडिलांनी एकदा पैसेदेखील दिले होते. त्यांनतर पुन्हा पैसे आणण्यासाठी मोनिकाचा पती व सासू छळ करत होते. याबाबत मोनिका हिने वेळोवेळी आपल्या वडिलांना देखील माहिती दिली होती. दरम्यान मोनिकाच्या वडिलांनी काही नातेवाईकांच्या मदतीने मोनिकाचे पती व सासूला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांनतर नुकतेच १२ ऑगस्ट रोजी मोनिका भगवान चंद्रावळे या विवाहितेने आपल्या चार वर्षांच्या साई ऊर्फ ऋषी भगवान चंद्रावळे या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेचे वडील बाळू बबन आरगडे (वय ५०, रा. काळूस) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेचा पती भगवान राजेंद्र चंद्रावळे व सासू चंद्रभागा राजेंद्र चंद्रावळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.
करंदीतील मायलेकाच्या आत्महत्येप्रकरणी पती व सासूवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:14 AM