शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

ऊसाच्या शेतात पळालेला सराईत गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 6:51 PM

आरोपीचे वय २३ वर्षे,गुन्हे मात्र २४... 

ठळक मुद्देअंगातील कपडे काढुन ऊसाच्या खोडापाशी सापडला उघडा बसलेला आरोपी

आव्हाळवाडी : मांजरी खुर्द वाघोली रस्त्यांने लोणीकंद गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना, मागे पुढे नंबर नसलेल्या दुचाकी वरून मांजरी खुर्द हद्दीत एक जण आढळून आला. त्याच्याकडे गाडी,नंबर प्लेटबाबत चौकशी केली असता ती व्यक्ती दुचाकी सोडून,शेजारच्या ऊसाच्या शेतात पळून गेली .      पोलिसांची आणखी कुमक मागवून मांजरी खुर्द पोलीस पाटील, पोलीस मित्र, शांतीदुत ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी अर्धा एकर ऊस अक्षरश: दोनदा पिंजुन काढला. शेवटी तिसऱ्यांदा हवालदार बाळासाहेब सकाटे यांना ऊसाच्या खोडापाशी अंगातील कपडे काडून उघडा बसलेला आरोपी बंड्या उर्फ बंडू मधुकर पवार (वय २३, रा.ढोकबाबळगाव ,ता.मोहोळ, जि.सोलापूर) हा सापडला..................आरोपीचे वय २३ वर्षे,गुन्हे मात्र २४ आरोपीस लोणीकंद पोलीस स्टेशनला नेऊन अधिक चौकशी करता आरोपी बंड्या ऊर्फ बंडू मधुकर पवार याचेवर घरफोडी व चोरीचे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन दोन गुन्हे दाखल, फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर एक गुन्हा दाखल, जीआरपी सोलापूर रेल्वे पोलीस एक गुन्हा दाखल, सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन एक, तर पुणे जिल्ह्यातील लोणीकंद, लोणी काळभोर, यवत,रांजणगाव, वडगाव निंबाळकर, दौंड,हडपसर अशा विविध ठिकाणी नऊ घरफोडी उघडकीस आल्या आहेत.    तपासादरम्याने आरोपीकडून दुचाकी, चारचाकी आणि चोरी करण्यात आलेला ऐवज ताब्यात घेण्यात आला. आरोपी कडून फक्त चार दिवसात नऊ घरफोड्या, नऊ मोटारसायकल, एक मोटार कार, ५८ ग्रँम सोने, १०५ ग्रँम चांदी, ०२ एलईडी, ०४ मोटार कारचे टायर व डिस्क असा साडेसात लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. आरोपीस १६ जानेवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.       ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उप पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक मोहन अवघडे, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, पोलीस काँस्टेबल समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, दत्ता काळे, प्रफुल्ल सुतार, सुरज वळेकर,या पथकाने कार्यवाही केली.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिस