पुणे : यापुढे कोणत्याही सार्वजनिक इमारतीस टाळे ठोकल्यास, शाळांमधील विद्यार्थी अथवा शिक्षकांचा राजकीय कारणांसाठी वापर झाल्यास आता सक्त कारवाई करण्यात येणार असून हे सर्व गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने नुकतेच आदेश जारी केले आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्यास, संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा, असे निर्देश सर्व गटविकास अधिकाºयांना दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. निषेध करताना सार्वजनिक मालमत्तेची हानी करून अथवा सार्वजनिक हिताला बाधा येईल अशा पद्धतीने अडथळे निर्माण करणे अभिप्रेत नाही. अशा स्वरूपाच्या घटना घडल्यानंतर तीन तासांच्या आत गुन्हा नोंदवून त्याची प्रत मुख्यालयाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक कार्यालयांना टाळे ठोकल्यास फौजदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 3:33 AM