शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

Video: पुण्याच्या मुळा नदीतील गंभीर प्रकार; भराव टाकून अतिक्रमण करण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 19:43 IST

कारखान्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी व नागरीकीकरणामुळे मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणात वाढ गंभीर समस्या बनली आहे.

पाषाण : बालेवाडी पिंपळे निलख परिसरात मुळा नदी पात्रात हायवा ट्रक आणि जेसीबीच्या साह्याने भराव टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणेबाबत रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. विशाल वाघमारे यांनी वाकड येथे मुळा नदी पात्रात भराव टाकणाऱ्यांचे व्हिडीओ शूट करून संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. 

पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका हद्दीतून मुळानदी १२.५० किलोमीटर अंतरावर वाहते. या मुळा नदी पात्रात भराव टाकुन अतिक्रमण करण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु आहेत. कारखान्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी व नागरीकीकरणामुळे मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणात वाढ गंभीर समस्या बनली आहे. 

त्याचप्रमाणे प्रदूषणा बरोबर नदीपात्रात व पात्रालगत होणारे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि घरे यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून, भराव टाकून नदीचे पात्र बुजवले जात आहे. नद्यांचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असून पावसाळ्यात शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रालगतची झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दोन्ही महानगरपालिकांना देण्यात आला होता.

परंतु या आदेशाची अंमलबजावणी होण्याआधीच नदीपात्रालगत भराव टाकणा-यांवर  कारवाई होण्याआधीच  आता थेट नदीपात्रातच भराव टाकण्याचे काम जोरात सुरू आहे . अत्याधुनिक हायवा ट्रक व जेसीबीच्या सहाय्याने मुळा नदी पात्रात भराव टाकुन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड  व पुणे महानगरपालिका अधिकारी या संतापजनक गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत असून मुळा नदी पात्रात भराव टाकण्यामागे कोण आहे? बांधकाम व्यवसायिक आहे की राजकीय पुढारी आहे? हे समोर येणे गरजेचे आहे.नदी पात्रात भराव टाकण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी तसेच मुळा नदीपात्रातील टाकलेला भराव कोण काढणार याची जबाबदारी कोण घेणार?

तसेच संबंधित प्रकरणात या भराव टाकणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे की,पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वादातून वेळ काढून कारवाई करणार का असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची एकत्र समिती स्थापन करुन नदी प्रदूषणाबाबत व नदीपात्रालगत अतिक्रमणाबाबत ॲक्शन प्लॅन तयार करण्याची तयारी सुरू होती. परंतु या ॲक्शन प्लॅन संबंधित यंत्रणांना विसर पडला आहे.

या अगोदर ही मुळा नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रार केली आहे.परंतु नोटीस पाठवणे पलीकडे  कोणतीही कारवाई झाली नाही. स्थानिक प्रशासकीय व्यवस्था या गंभीर प्रश्नाबाबत उदासीन असल्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच नदी पुनर्जीवित करून पुणे महानगर पालिका व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला योग्य उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका