बारामती : सहकारी संस्थांवर ताबा मिळविण्यासाठी राज्य सरकार सहकाराची नियमावली बदलू पाहत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र धोक्यात येणार आहे. सहकार तत्त्वावर चालणाºया बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संगणकीय लिलाव प्रणालीचे उद्घाटन, जळोची उपबाजारातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.या वेळी पवार म्हणाले, की सहकारमंत्र्यांना त्यांच्या गावात बाजार समिती आपल्याकडे घेता येत नसल्याने त्यांनी हा निर्णय आतताईपणे घेतला आहे. शासनाच्या नवीन धोरणामुळे यापुढील काळात फक्त १५ संचालकांना संधी मिळेल. समितीत शेतमाल आणणाºया प्रत्येक शेतक-याला या निर्णयामुळे मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप येईल. यापूर्वी वेगवेगळ्या गटांतून बाजार समितीवर सर्व घटकांना संधी मिळत असल्याने अनेकांना सामावून घेणे शक्य होत असे. मात्र, शासनाच्या नवीन धोरणामुळे यापुढील काळात केवळ १५ संचालकांना संधी देणे शक्य होईल.या निर्णयामुळे ज्या समित्यांची निवडणूक घेण्याची ऐपत नाही, तेथे प्रशासक नेमून सरकार त्यांना हवा तसा कारभार करेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.शेतमाल विक्रीची रक्कम आॅनलाइन पद्धतीने शेतकºयांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठीप्रयत्न करणे गरजेचे आहे. जनावरांच्या बाजारात सुपे येथील उपबाजारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांचा दहा कोटींचा कृती आराखडा समितीने तयार केला असल्याचे पवार यांनी सांगितले.या वेळी प्रास्ताविक करताना समितीचे सभापती रमेशराव गोफणे म्हणाले, की या प्रणालीसाठी १ कोटीचा खर्च आला आहे.हे काम १०० टक्के अनुदानातून जागतिक बँक अर्थसाहाय्यातून करण्यात आले आहे. भविष्यात या पद्धतीमुळे शेतकºयास दर वाढवून मिळतील. स्वागत सचिव अरविंद जगताप यांनी केले.उपसभापती विठ्ठलराव खैरे यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते अध्यक्षस्थानी होते.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, इम्तियाज शिकिलकर, पोपटराव तुपे, अमोल वाडीकर,शंकरराव सरक,बाजार समिती संचालक बाळासोा गावडे, दिलीप जगताप, प्रताप सातव, अनिल खलाटे,राजेंद्र बोरकर,बाळासाहेब पोमणे,रत्नाबाई चौधरी,शशिकला वाबळे, वसंत गावडे, दत्तात्रय सणस, शौकत कोतवाल, नारायण कोकरे, बापट कांबळे, अनिल हिवरकर, नितीन सरक, पोपट खैरे, दिलीप खोमणे आदी या वेळी उपस्थित होते.संगणकीय लिलाव प्रणालीमुळे बाजार समिती राज्यातपहिल्या क्रमांकाची होणार आहे. बाजार समिती आणि शेतकरी, व्यापाºयांमध्ये पारदर्शकता येणार आहे. या प्रणालीचा शेतकरी, व्यापाºयांना फायदा होणार आहे. शेतकºयांना इतर समितीतील बाजारभाव समजणार आहेत. व्यापारी आॅनलाइन पद्धतीने माल घेतील. मालाची प्रतवारी केली जात नाही, तोपर्यंत या प्रणालीत भाग घेण्यास काही मर्यादा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:41 AM