सोयाबीन, बाजरी, मका या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढविण्यासाठी या पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे शुल्क तालुका कृषि अधिकारी, बारामती यांचे कार्यालयात येऊन चलनाद्वारे जमा करावयाची आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये व तृतीय क्रमांकास २ हजार रुपये असे बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.
कृषि विभागाच्या वतीने पीक स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:14 AM