बारामती : एटीएममध्ये भरणा करणाऱ्या खासगी कंपनीची कर्मचाऱ्यांकडुन १ कोटी १ लाख ८ हजार ८०० रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे.कंपनीचे ऑडिट सुरु असताना हा उघड झाला आहे.याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि. चे ब्रँच मॅनेजर संदिप बाळासाहेब इंगवले (वय ३८ वर्षे,रा. चंद्रकिसन निवास, औंध कॅम्प, पिंपळे निलख ) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपी विकी विलास पवळ (वय २५ वर्षे रा. शहाजीनगर भोडणी ,ता.इंदापुर जि.पुणे),अभिजित कोयनाप्पा मदने( वय २५ वर्षे रा.झारगडवाडी ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक १ जुन ते २० सप्टेंबर २०१९ रोजी १२ ते ६ च्या दरम्यान हा प्रकार घडला. रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे कस्टोडियन पवळ आणि मदने यांनी कंपनीची एक कोटी एक लाख आठशे रुपये एवढया रोख रक्कमची विश्वासघात करूण फसवणुक केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.कंपनीच्या वतीने सबंधितांविरूध्द कायदेशीर फिर्याद देण्यात आली असुन कंपनीचे ऑडिट चालु असल्याने ,हा प्रकार फिर्यादी इंगवले यांनी वरिष्ठांचे निदर्शनास आणला .त्यानंतर याप्रकरणी फिर्याद दिल्याचे इंगवले यांनी फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी आर गंपले करीत आहेत. संबंधित कंपनी बारामती शहरातील काही बँकाच्या एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करते.या दरम्यान, एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करताना १ कोटी १ लाख रुपये रोख रकमेचा गफला झाल्याचे कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.परिसरातील १७ एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करताना आरोपींनी आर्थिक फसवणुक केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
एटीएममध्ये रोकड भरणा करणाऱ्या कंपनीची 'कोटी' ची फसवणुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:30 PM
संबंधित कंपनी बारामती शहरातील काही बँकाच्या एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करते...
ठळक मुद्देभरणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच रोकड केली लंपास