Rohit Pawar ( Marathi News ) : पुणे- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. आदिवासी मुलांसाठी असलेल्या आश्रम शाळेत दुधामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आमदार पवार यांनी हे आरोप पत्रकार परिषद घेऊन केले आहे. एका अज्ञात व्यक्तीने माझ्या ऑफिसमध्ये या घोटाळ्याबाबत कागदपत्रे आणून ठेवल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
'सुनावणी लवकर करा अन्यथा...', केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद, CJI चंद्रचूड म्हणाले...
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, सत्तेत असणाऱ्याच कुठल्यातरी नेत्याने माझ्या ऑफिसला फाईल पाठवल्या आहेत. अशा ११ फाईल आहेत. आता मी ११ पैकी दोन फाईल आणल्या आहेत, इतर पाईलपेक्षा या फाईलचा आकडा लहान आहे. पहिल्या फाईलमध्ये दूध घोटाळ्याची माहिती आहे. राज्यात ५५२ आश्रम शाळा आहेत. तेथील मुलांच्या आरोग्यासाठी दररोज दूध मिळण्याचा जीआर काढला आहे. या शाळेत एकूण विद्यार्थी १ लाख ८७ हजार आहेत. एखाद्या संस्थेला दूध पुरवठा असेल तर त्याासाठी कॉन्टक्ट दिले जाते, याबाबत करार आहेत. पहिल्या करारात अमुल,चितळेकडून दूध घ्यायला हरकत नाही असं यात म्हटले आहे. जेव्हा २०१८-१९ मध्ये करार झाला होता तेव्हा ४६.४९ रुपये लीटर असा दर होता, दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमुलसाठी४९. ७५ रुपये करार झाला होता. २३-२४ मध्येही तसेच टेंडर काढले हे टेंडर १६४ कोटींचे टेंडर आहे, यात ५ कोटी ७१ लाख पॅकेट्स घ्यायचे होते. २०२३-२४ मध्ये १४६ रुपये प्रतिलिटर दराने कंत्राटदारास पैसे देण्यात आले आहेत.
२०२३-२४ मध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाले
दूध शेतकऱ्यांकडून ३० रुपये प्रति लिटर रुपये टेट्रा पॅक ५५ रुपये दूध खरेदी व्हायला हवे होते. यासाछी ८५ कोटी रुपये खर्च व्हायला होते. पण आता प्रत्यक्षात १६५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यात ८० कोटींची दलाली देण्यात आली आहेत. या कामासाठी आंबेगाव तालुक्यातील एका खासगी दूध उत्पादक संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे, यात सत्तेत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका नेत्याला देण्यात आले आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
अतिरिक्त ८० कोटी दिले आहेत ते सरकार परत घेणार आहेत का? याबाबतचे पत्र मी पीएमओला देणार आहे. या दोन कंपन्या कोणाच्या आहेत याचा अभ्यास झाला पाहिजे, तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी गेलो आहे. तुम्ही विकास सर्वसामान्यांचा केला की तुमच्या मित्राचा केला, असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी सरकारला लगावला.