शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेत कोटींचा भ्रष्टाचार - संजय जगताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 11:48 PM

पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही.

भुलेश्वर - पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही. योजना सरकार बनवते, चालवते; मग एवढा पैसा लागतो कशाला. माहिती व्यवस्थित मिळत नाही. पैसे भरूनही पाणी मिळत नाही. पैसा जातो कोठे, यामुळे पुरंदर उपसा योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे मत काँग्रेसचेपुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मांडले. ते पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘चलो पंचायत अभियाना’दरम्यान बोलत होते .ते पुढे म्हणाले की, सत्तेत असून व जलसंपदा व जलसंधारण विभागाचे मंत्री असूनदेखील आपल्या लोकप्रतिनिधींना पुरंदरच्या पठारावर गुंजवनीचे पाणी आणता आले नाही. बंद पडलेली पारगाव-माळशिरस नळपाणी पुरवठा प्रादेशिक योजनासुद्धा सुरू करता आली नाही. ती योजना काँग्रेस व मित्रपक्षांमुळे सुरू होत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे प्रभारी मनीष चौधरी व महासचिव गणेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, सुनीता कोलते, पुरंदर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा मार्केट कमिटीचे नंदकुमार जगताप, मारुती पाटोळे, समीर मुळीक, नीलेश जाधव, अनिल जाधव, माजी सरपंच एकनाथ यादव,शांताराम यादव,माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, विकास इंदलकर,दिलीप मोरे, रफिक शेख, वैशाली बोरावके, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा ताम्हाणे, संदीप यादव,नीलेश गाडेकर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन जयेश गद्रे, प्रास्ताविक माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, तर आभार पुणे जिल्हा गटसचिव संघटनेचे सचिव रफिक शेख यांनी मानले.शक्ती अ‍ॅप वापरानुकत्याच परराज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांनी आपल्या भागातील अडचणी, तसेच आपला उमेदवार कोण असावा, हे कळविल्यामुळे तेथील अडचणी दूर झाल्या व योग्य उमेदवार दिल्यामुळे सत्तांतर झाले, महाराष्ट्रातदेखील बदल घडविण्यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये शक्ती अ‍ॅप वापरण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस