निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:24 PM2024-09-26T13:24:46+5:302024-09-26T13:25:09+5:30

पुणे शहरातील टप्प्याटप्याच्या उदघाटनासाठी मोदी येतात, त्यामुळे राज्याचा तिजोरीवर किती बोजा पडतोय याची कल्पना सुद्धा या यंत्रणेला येत नाही का?

Crores of rupees should not be crushed keeping the election in sight ravindra dhangekar's request to the government | निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्याच्या कारणाने पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्याबाबत आमदार धंगेकरांनी सरकारला विनंती केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेचे पैसे वाया न घालवता हा उपक्रम सरकारने करावा. अशा प्रकारे कोरोडोंचा चुराडा करू नये असे त्यांनी सांगितले आहे. 

धंगेकर म्हणाले,  मोदींचा दौरा रद्द झाला आणि उदघाटनही रद्द झाले. पुणे शहरातील टप्प्याटप्याच्या उदघाटनासाठी मोदी येतात. राज्याचा तिजोरीवर किती बोजा पडतो. याची कल्पना सुद्धा या यंत्रणेला येत नाही. आज करोडो रुपयांचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने होणार होता आणि झालेला आहे. पंतप्रधान मोदींनी इतर कार्यक्रमांपचे त्यांच्या ऑफिस मध्ये बसून उदघाटन केलं आहे. तस जर केलं असत तर लाखो रुपयांचा बोजा सरकारवर पडला नसता. भिडे वाड्यामध्ये स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी त्यावेळी केलं होत. पण आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उदघाटनाचा घाट घातला जातोय. आम्ही पुणे आणि महाराष्ट्रासाठी काही तरी करतोय हे दाखवण्याची पद्धत राजकारणाला समाजकारणाला पूरक अशी नाहीये. यामध्ये राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उदघाटन करायला पाहिजे होत. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उदघाटन करून हा भुयारी मार्ग त्यांनी चालू करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 

जनतेचे पैसे वाया न घालवता हा उपक्रम करावा - धंगेकर 

मेट्रोचा डीपीआर सर्वात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने आणला आहे. त्यावेळी काँगेस पक्षाने एवढा खर्च केला नाही. त्याची जाहिरात केली नाही. भाजप हे पैसे खर्च करून दाखवत आहे कि, आम्ही देशासाठी काय करतो. अशा उपक्रमांचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी उदघाटन केले तरी चालेल. वारंवार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा खर्च करू नये. जनतेचे पैसे वाया न घालवता हा उपक्रम करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. 

Web Title: Crores of rupees should not be crushed keeping the election in sight ravindra dhangekar's request to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.