पुणे : जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी १२ तालुक्यांमधे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, चार तालुक्यांत दुप्पट आणि एका तालुक्यात तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. केवळ इंदापूर तालुक्यातच सरासरीच्या ८९.४१ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली. जुलैतील तीन आठवडे फारसा पाऊस झाला नव्हता. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात २५ जुलै ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख २३ धरणे भरली. पुण्यातील पावसामुळे खडकवासला साखळीसह कुकडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने ११७.४७ अब्ज घनफूटाचे (टीएमसी) उजनी धरणही पूर्ण भरले. ऑक्टोबर महिन्यातही पावसाची उपस्थिती आहे. त्यामुळे पर्जन्य छायेतील शिरुर, बारामती, दौंड आणि पुरंदर या तालुक्यातही पावसाने सरासरी गाठली आहे. केवळ इंदापूर तालुक्यात ३२६.५३ (८९.४१ टक्के) सरासरी इतका पाऊस झाला नाही. मुळशी पौडमधे दुप्पट, भोरमध्ये अडीचपट, जुन्नर आणि खेड तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. तर, मावळ तालुक्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सरासरी ११८९.६५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा येथे तब्बल ३७८४.७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच, मावळमध्ये सरासरीच्या ३१८.१४ टक्के पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात ३६५.२२ मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. तेथे ३२६.५३ (८९.४१ टक्के) मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात दौंड तालुक्यात सर्वांत कमी पाऊस आहे. येथे आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्या पर्यंत ३३२.१४ मिलिमीटर पाऊस पडतो यंदा तो ३३३.६३ (१००.४५ टक्के) मिलिमीटर झाला आहे. जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधीत १०,३४१.३४ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो १८,५२८ मिलिमीटर (१७९.१७ टक्के) झाला आहे. जून ते १५ ऑक्टोबरपर्यंतची पावसाची सरासरी (मिलीमीटरमधे)
...............................
तालुका जून ते १५ प्रत्यक्षातील टक्का ऑ क्टोबरचा पाऊस सरासरी पाऊस हवेली ५२१.६२ ७२२.७३ १३८.५५मुळशी-पौड ५४८.१९ ३२५५ २१०.२५भोर ९२२.९७ २२४४.७७ २४३.२१मावळ ११८९.६५ ३७८४.७७ ३१८.१४वेल्हे २४१९.८३ २७७६.२५ ११४.७३जुन्नर ६४२.३३ १३५७.७७ २११.३८खेड ५७३.५४ १३११.९८ २२८.७५आंबेगाव ६७१.०९ ८६९.०९ १२९.५१शिरुर ३८८.५८ ४२२.४४ १०८.७१बारामती ३६८.३६ ४३९.५८ ११९.३३इंदापूर ३६५.२२ २६.५३ ८९.४१दौंड ३३२.१४ ३३३.६३ १००.४५पुरंदर ३९७.८२ ६८४.३० १७२.०१
.........
पावसाने यावर्षी दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणे पूर्ण भरली आहे. परिणामी, पाण्याचा प्रश्न मिटला आहे. रब्बीसाठी हे पाणी फायदेशीर ठरणार असून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.