पुणे : शाळांच्या सुट्ट्या संपत अाल्याने तसेच शहरातील अनेक शाळा सुरु झाल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची तसेच पालकांची गर्दी बाजारपेठांमध्ये हाेतना दिसत अाहे. त्यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्याअसून शालेय साहित्यांनी दुकाने भरुन गेली अाहेत.
नुकताच शहरातील अनेक शाळांचे निकाल जाहीर झाले अाहेत. तसेच 10 वी अाणि 12 वीचे निकालही जाहीर झाले. शहरातील अनेक शाळा सुरु झाल्या असून काही शाळा येत्या अाठवड्यात सुरु हाेणार अाहेत. त्यामुळे पुढील वर्गाचे शालेय साहित्य, वह्या, पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची पाऊले अाता बाजारपेठांकडे वळू लागली अाहेत. त्याचबराेबर नवीन वर्षासाठी नवा शाळेचा पाेषाखही घेण्यासाठी विद्यार्थी गर्दी करीत अाहेत. पुण्यातील अाप्पा बळवंत चाैक हा पुस्तकांचा चाैक म्हणून अाेळखला जाताे. या ठिकाणी शेकडाे पुस्तकांची तसेच शालेय वस्तूंची दुकाने अाहेत. कुठलेही पुस्तक असाे अाप्पा बळवंत चाैकात ते पुस्तक मिळतेच मिळते. त्याचबराेबर ज्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके घेणे शक्य नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तके विकणारी दुकाने सुद्धा येथे पाहायला मिळतात.
अनेक राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांतर्फे गरजू विद्यार्थ्यांना माेफत वह्यांचे वाटपही करण्यात येत अाहे. त्याचबराेबर कमी दरात विद्यार्थ्यांना पुस्तके विकण्यात येत अाहेत. अाप्पा बळवंत चाैकात असे अनेक वह्यांचे स्टाॅल सध्या पाहायला मिळत अाहेत.