शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:34 AM

नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

लोणी काळभोर - नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी महेश आगलावे यांनी विधिवत महापूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. थंडीमुळे भाविकांची गर्दी पहाटे कमी होती. सकाळी ९ वाजल्यानंतर त्यात वाढ झाली. ती रात्री आरतीपर्यंत कायम होती. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी सात वाजता विश्वस्त आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली.भाविकांना देवस्थानच्या वतीने ८० किग्रॅची उपवासाची खिचडी व थेऊरगावातील तरुणांच्या चिंतामणी तरुण मंडळाच्या वतीने ३०० किलो साबुदाणा चिवड्याचे वाटप केले. संपूर्ण मंदिर आवार व गाभाºयात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. आगलावेबंधूंच्या वतीने दर्शनबारीवर मंडप आणि पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.आळंदी देवाची येथील स्वकामसेवा या सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकांनी येथील परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास जाणवला नाही. तीन दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात असलेले तणावपूर्ण वातावरण, तसेच पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा असूनही भाविकांची गर्दी झाली होती. त्यांना दर्शन घेणे सोईचे व्हावे, यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. याचबरोबर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी होमगार्डसहित कर्मचाºयांची चोख बंदोबस्त व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही व पोलीस हवालदार मारुती पासलकर यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने पुणे - सोलापूर महामार्ग ते थेऊरदरम्यानच्या रस्त्यावरील वाहतुकीच्या नियोजनांत त्रुटी न ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला.१ जानेवारीपासून पीएमपीच्या वतीने हडपसर थेऊरमार्गे वाघोली अशी बससेवा सुरू केली. ही सेवा सुरू व्हावी, यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासमवेत थेऊर, कोलवडी, केसनंद ग्रामपंचायतींने विशेष प्रयत्न केले होते. त्याला महाव्यवस्थापक तुकाराम मुंढे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या मार्गावर बससेवा सुरू झाल्याने नगर महामार्गावरून दर्शनासाठी येणाºया भाविकांची सोय झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.ओझरला विघ्नहराच्या दर्शनासाठी रांगाओझर : संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे ५.०० वाजता देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त देविदास कवडे, शंकर कवडे, प्रकाश मांडे, बबन मांडे, साहेबराव मांडे, अनिल मांडे व ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वाजता आणि दुपारी १२.०० वाजता माध्यान्ह आरती करण्यात आली.सकाळी ८.०० वाजता नियमित पोथीवाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता ‘श्रीं’स नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात करण्यात आले. येणाºया भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, पिण्याचे पाणी, खिचडीवाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहरबाग, वाहनतळ कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन आदी व्यवस्था करण्यात आली.सायंकाळी ७.०० वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत साईनाथमहाराज गुंजाळ तेजेवाडी यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रासादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी दिली. सर्व वारकºयांना अन्नदान तुळशीराम बाबूराव मांडे यांनी केले. पहाटे ५ ते रात्रौ ११ पर्यंत एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्रौ १०.३० वाजता शेजारती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.महाप्रसादाचे देणगीदार शांतारामशेठ पिसाळ (भोसरी), जयंत म्हैसकर (अंधेरी मुंबई), अनिल कुमार गांधी, (चेंबूर मुंबई), प्रवीण अनंतराव चौघुले (आळेफाटा), शंभूकुमार कासलीवाल (मुंबई), डॉ. रमेश सातारकर (औरंगाबाद) यांनी प्रत्येकी एकवीस हजार रुपये अन्नदानासाठी दिले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, अध्यक्ष व कर्मचारीवर्ग व ओतूर पोलीस ठाणे यांनी केलेसिद्धटेकला भाविकांची गर्दीदेऊळगावराजे : श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे देवाला अभिषेक करून महाआरती करण्यात आली. गणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर पहाटे ५ वाजता दर्शनासाठी उघडण्यात आले. गणपतीला दुपारी १२ वाजता नैवेद्य दाखविण्यात आला भाविकांना दर्शन लवकर मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड संस्थानाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवnewsबातम्या