शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

देखावे पाहण्यासाठी ओसंडली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 6:28 AM

गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहराच्या मध्यवस्तीमध्ये भाविकांचा अक्षरश: महापूर उसळला होता. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मंडळांचे देखावे पाहायला बाहेर पडलेल्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते.

पुणे : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहराच्या मध्यवस्तीमध्ये भाविकांचा अक्षरश: महापूर उसळला होता. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मंडळांचे देखावे पाहायला बाहेर पडलेल्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. ‘पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा’, ‘माझ्या गणानं घुंगरू हरीवलं’, ‘गणपती राया, पडते मी पाया’ या गाण्यांसह अष्टविनायक चित्रपटातील गाण्यांमुळे वातावरणही गणेशमय झालेले होते.पुण्याचा गणेशोत्सव देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. शहरातील मंडळांकडून सादर केल्या जाणाºया देखाव्यांचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे देखावे मंडळांकडून सादर करण्यात येत असतात. ऐतिहासिक, पौराणिक आणि काल्पनिक विषयांवरील हलत्या व जिवंत देखाव्यांना कायमच पसंती मिळते. गणेश चतुर्थीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या सात दिवसांत दररोज पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, गर्दी वाढतच गेली. घरच्या गणपतींचे गौरींसह गुरुवारी विसर्जन झाले. त्यानंतर आबालवृद्ध देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते.श्रीमंत दगडूशेठ गणपती, बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळांच्या सजावटींची श्रीमंती भाविकांना अनुभवायला मिळाली. छत्रपती राजाराम मंडळ, खजिना विहीर मंडळ, विश्रामबागवाडा मंडळ, शनिपार मंडळासह सदाशिव, शनिवार, नारायण, रविवार, गुरुवार, शुक्रवार या पेठांतील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गुरुवारी रात्री गर्दी झाल्याचे चित्र होते.दर वर्षीप्रमाणे बाजीराव रस्त्यावरच्या नातू बाग मित्र मंडळ आणि चिमण्या गणपती मंडळाने सादर केलेली विद्युतरोषणाई पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्त्यावरही भाविकांची गर्दी दाटली होती.अनेक मंडळांनी संगीत कारंजे सादर केलेले आहे. देखणी प्रकाशव्यवस्था, रिमिक्स गाण्यांचा ठेका आणि त्यावर थिरकणाºया जलधारा पाहून गणेशभक्त आनंदित होत होते.मुलांना खांद्यावर घेऊन जाणारे पालक, खेळण्यांसह विविध वस्तूंची दुकाने, बासरी-पिपाण्यांची विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वडापाव आणि भजीचा खमंग वास, पाणीपुरीची तिखटगोड चव अशा विविधरंगी वातावरणात गुरुवारचा दिवस पुणेकरांनी अनुभवला.या वर्षी मंडळांनी तिसºया दिवसापासूनच देखावे खुले केल्याने पुणेकरांसह पुण्याबाहेरून आलेल्या भाविकांना पर्वणीच मिळालीहोती. अनेक पुणेकरांनी बाहेरून आलेल्या पाहुण्यांना मानाच्यापाचही गणपतींसह प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन घडविले. सातव्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्साहात भरच पडली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव