येत्या गुरुवारी दि महाशिवरात्री असून तीर्थक्षेत्र जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केले आहे. या कलमानुसार १० तारखेपासून १२ तारखेपर्यंत जेजुरीत जमावबंदी करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त जेजुरी गडावर शिखर, गाभारा आणि पाताळलिंग अशी तीनही लोकींचे दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना असते. यामुळे जेजुरीत लाखावर भाविकांची गर्दी होते. कोरोनाचा प्रसार नव्याने सुरू झाल्याने ही काळजी घेण्यात येत आहे. जेजुरी गडावरील तीन लिंगांचे दर्शन ही भाविकांना घेता येणार नाही. ज
मावबंदीचा आदेश कोणीही मोडू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे .
शासकीय आदेशानुसार जेजुरीत बाहेरील वाहनांना जेजुरीत येण्यास बंदी घातली आहे. सर्व हॉटेल आणि लॉज कोणीही बुकिंग करू नये. १३ मार्चपासून जेजुरीत सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत