मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या प्राथमिक आरोग्य केंद्राने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन फिजिकल अंतर राहावे यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. या भागातून अजून कोरोनाचा नायनाट झालेला नाही. त्यामुळे ही गर्दी कोरोनाच्या प्रसारास निमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्राथमिक आरोग्य केंद्राने योग्य ठिकाणी लसीकरण करण्याची आवश्यकता होती. परंतु होणाऱ्या गर्दीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरणासाठी ही झालेली गर्दी पाहून अनेक नागरिकांनी लस घेण्याचे टाळले आहे.