खडकवासला - वेळेवर सुरू झालेला मॉन्सून आणि शाळा- महाविद्यालयांच्या शेवटच्या सुट्ट्यांचा काळ असा योग जुळून आल्यामुळे खडकवासला सिंहगड परिसर पर्यटकांनी हाऊसफुल झाला होता. गडावरील वाहनतळावरील जागा संपल्यामुळे दुपारी साडेबारानंतर गडावर जाणारी वाहनेही बंद करण्यात आली होती.संपत आलेला उन्हाळ्यातील सुट्ट्यांच्या हंगामातील शेवटचा रविवार आणि वेळेवर आलेल्या मॉन्सूनचं आगमन असा सुवर्ण योग आज पर्यटकांसाठी जुळून आला होता. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि ऊन-पावसाचा दिवसभर चाललेला खेळ पर्यटकांना सुखावून जात होता.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सिंहगडाच्या डोंगरदºयात अलगद उतरणाºया ढगांनी सर्व परिसर व्यापला होता. पावसाच्या सरींबरोबर ढगांच्या पाठशिवणीच्या खेळात सूर्यही हजेरी लावत होता. अशा निसर्गाच्या मोहक रूपांचा अनुभूतीने पर्यटक चिंब झाले होते.पावसाळ्यातील पहिलाच रविवार आणि सुरू झालेला पाऊस अशा वातावरणात पर्यटकांची पावले सहज ऐतिहासिक सिंहगडावर वळतात. पावसाळ्यातील सिंहगडाचे विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाला आपल्या स्मृतीत जपण्याचा मोह होणे तसे स्वाभाविकच.असे सिंहगडचे विहंगम दृश्य अनेक पर्यटक आपल्या कॅमेºयात टिपण्यात मग्न होते. तर मक्याच्या कणसांचा भुट्टा खाण्याचा आनंद काही जण घेत होते.आज सकाळपासून खडकवासला आणि सिंहगड परिसर पर्यटकांनी व्यापला होता. सिंहगड रस्ता सकाळपासून गर्दीने वाहत होता. हवेली पोलिसांनी सिंहगड रस्ता, खडकवासला धरण, सिंहगडावर बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे आणि पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांच्यासह चाळीस पोलीस कर्मचारºयांचे पथक येथे तैनात करण्यात आले होते. होमगार्डच्या कर्मचाºयांचीही मदत घेण्यात आली होती. गडावरून खाली येणारी वाहतूक कोंढणपूरमार्गे वळवण्यात आली. खडकवासला धरण चौकातील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. आज गडावर जाण्याºया वाहनांची संख्याही खूप होती. दिवसभरात सात ते आठ हजार पर्यटकांनी सिंहगडाला भेट दिली. सिंहगड घेरा समितीला ८३ हजार रुपये महसूल मिळाल्याचे वन संरक्षण अधिकारी हेमंत मोरे यांनी सांगितले.
सिंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 2:37 AM