पुणे : सकाळी ७ वाजता मतदान सुरु होते, तेव्हा सकाळी फिरायला तसेच कामाला जाणारे मतदान केंद्रावर येऊन मतदान करुन जातात़. त्यामुळे पहिल्या दोन तासात अनेक ठिकाणी गर्दी झालेली दिसते़. ही गर्दी साधारण ११ वाजेपर्यंत होत असते़.जस जसे उन्ह वाढत जाते तसा मतदानाचा टक्का कमी होत जातो़. त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यापासून पुन्हा शेवटच्या दोन तासात गर्दी होताना दिसते़ . ही परिस्थिती सर्वसाधारणपणे सर्व शहरी भागात दिसून येते़. वडारवाडीतील मतदान केंद्रांवर तर सकाळी अगदी शुकशुकाट होताना पण मतदानाची वेळ संपताना प्रचंड गर्दी झालेली आजवरच्या लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधून दिसून आले़. मात्र, यंदा मात्र तेथे नेमके उलट चित्र दिसून आले़. वडारवाडी येथील संत रामदास विद्यालयात नेहमी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान होत असते़. येथे एका इमारतीत पाचहून अधिक मतदान केंद्रे असल्याने येथे जादा बंदोबस्त देण्यात आला होता़. इतर ठिकाणापेक्षा येथे सकाळी थोडे संथपणे मतदानाला सुरुवात झाली़. सकाळी ११ वाजल्यानंतर अन्य ठिकाणी मतदानाचा वेग कमी होत असताना येथे मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतर गर्दी वाढू लागली़. दुपारी १२ वाजल्यानंतर उन्ह वाढले तशी येथील मतदान केंद्रावरील गर्दी वाढू लागली़. दुपारी १ ते ३ दरम्यान तर येथे मोठी गर्दी झाली होती़. त्यामुळे मतदान केंद्रांवरील कर्मचारीही भर दुपारी झालेली ही गर्दी पाहून आश्चर्यचकित झाले होते़. या ठिकाणी दुपारी १ ते ३ यावेळेत सर्वाधिक मतदान झालेले दिसून येत होते़. जेथे रात्री उशिरापर्यंत मतदान होत होते़. तेथे सायंकाळी ६ वाजता मतदान संपले होते़. त्याबाबत लोकांना विचारले असता महिलांनी सांगितलेले कारण ऐकून मतदान केंद्रावरील कर्मचारीही चकीत झाले़. या महिलांनी सांगितले की अहो, आमच्या भागात दुपारी साडेतीन नंतर पाणी येते़. त्यानंतर घरातील कामे करायची असल्याने आम्ही सायंकाळी येण्याऐवजी अगोदरच मतदानाला आलो आहोत़. उन्हाळ्यात कमी व मर्यादित प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठाच्या वेळानुसार लोकांनी आपली कामे जुळवून घेतल्याचे हे उदाहरण मतदानाच्या निमित्ताने पुढे आले़.
भर दुपारी '' या '' मतदान केंद्रावर होती गर्दी कारण.... ऐकून व्हाल चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:19 PM
वडारवाडीतील मतदान केंद्रांवर तर सकाळी अगदी शुकशुकाट होताना पण मतदानाची वेळ संपताना प्रचंड गर्दी झालेली आजवरच्या लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधून दिसून आले़. .
ठळक मुद्देवडारवाडी येथील संत रामदास विद्यालयात नेहमी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान