शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

बीआरटीचे कोट्यवधी रुपये पाण्यात

By admin | Published: March 14, 2016 1:25 AM

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मजबूत बनविण्यासाठी बीआरटी योजना पुण्यात प्रथम हडपसर ते स्वारगेट या मार्गावर सुरू करण्यात आली. परंतु या बीआरटीमुळेच या रस्त्यावर वाहतूककोंडी

हडपसर : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मजबूत बनविण्यासाठी बीआरटी योजना पुण्यात प्रथम हडपसर ते स्वारगेट या मार्गावर सुरू करण्यात आली. परंतु या बीआरटीमुळेच या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.या योजनेसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेतून कोट्यवधींचा निधी मिळत असल्याने राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष त्या पैशांकडेच. त्यात ही बीआरटी योजना शास्त्रीय पद्धतीने कशी राबविली जाईल, याकडे लक्ष न देता नियोजनशून्य पद्धतीने केवळ सायकल ट्रॅक, फुटपाथ, दुभाजक आणि बसथांबे यावर कोट्यवधींचा खर्च करून राजकीय पुढारी व पालिका अधिकारी नामानिराळे झाले आहेत. सध्या मात्र या अर्धवट आणि तुटलेल्या बीआरटी मार्गामुळे लोकांचे नाहक बळी जात आहेत.सध्या हडपसर ते स्वारगेट या बीआरटी मार्गावर एकसलग अशी एक किलोमीटरही बीआरटी योजना असल्याचे दिसत नाही. नियमित रस्ता आणि बीआरटी रस्ता यात फरकच राहिला नाही. याउलट काही ठिकाणी तुटलेल्या बीआरटीच्या दुभाजकामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अडथळ्याची शर्यत ठरत आहे. मिक्स बीआरटी केवळ बोगसपणा असल्याचे येथील जाणकारांचे म्हणणे आहे. बीआरटी मार्गातून केवळ बीआरटीच्या बसेसच धावतील, असे नियोजन होते. मात्र सध्या या मार्गातून बस आणि इतर सर्वच वाहने धावतात. रामटेकडी येथील उड्डाणपूल उतरताच बीआरटीचा दुभाजक तुटला आहे. मगरपट्टा चौकात उड्डाणपूल बांधकामाच्यावेळी येथील बसथांबा व दुभाजक तोडला आहे. ४हडपसर उड्डाणपुलाखाली बीआरटीच्या बसेस जाण्यासाठी केलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता पडून आहे. गाडीतळ येथील नवीन सासवड उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तोडून टाकण्यात आला आहे. फातिमानगर चौक व मगरपट्टा येथील या बीआरटी बसेसच्या बसथांब्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.४बीआरटी मार्गात अन्य वाहनांनी शिरू नये, असे असले तरी हडपसर परिसरात बीआरटी मार्ग सलग नसल्याने अनेक वेळा नवीन प्रवासी काही मीटर बीआरटी मार्गात जातात. मग यांना पोलिसांकडून नो एंट्रीचा दंड आकारला जातो. ४फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचा वापर हा तर येथील वाहन पार्किंग, फळविक्रेते आणि पथारी व्यावसायिकांनाच होत असल्याने मुख्य रस्त्यावरूनच सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना जावे लागत आहे. बीआरटीत अनेक त्रुटी असल्याने सत्ताधारी व विरोधकांनी वेळोवेळी आंदोलने केली असली तरी हा मार्ग व बीआरटीची अडथळ्याची शर्यत कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ४फातिमानगर चौकात सध्या येथील कोंडीमुळे उड्डाणपुलाची गरज भासू लागली आहे. रेसकोर्स ते फातिमानगरदरम्यान नित्यच कोंडी होत असते. लांबच लांब रांगा लागतात. गोळीबार मैदानापासून एकेरी वाहतूक असल्याने वाहनचालकांना रस्ता मोकळा मिळतो. तेथील रस्त्यावर वाहतूक सुरळीत असते. मात्र रेसकोर्सपासून या रस्त्यावर वाहतुकीचे पुन्हा हडपसरपर्यंत ग्रहण लागते.