कळस : इंदापुर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यास (Sugar Factory) ऊस गाळपास देऊन शेतकर्यांनी सहकार्य करावे. यावर्षी गाळप होणार्या ऊसास प्रतिटन २५०० प्लस दर देण्यात येईल अशी घोषणा माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. इंदापुर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत असून भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. गेल्या वर्षीच्या हंगामातील काही रक्कम देण्याची राहीली आहे. मात्र गेल्या हंगामात २१० कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आली आहेत. उर्वरीत दहा पंधरा कोटीची रक्कम ही लवकरच देण्याचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या गाळप होणार्या ऊसास प्रतिटन २५०० प्लस दर दिला जाईल. याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
काही मंडळीकडून कारखान्याच्या बाबत चुकीचा अपप्रचार
''काही मंडळी कारखान्याच्या बाबत चुकीचा अपप्रचार करतात. मात्र ज्या संस्थेने हजारो कोटी सभासदांना दिले. त्या संस्थेत कोणाचेही देणे राहणार नाही. एक लाख टन ऊस बाहेर गेला. तरी १० कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे ऊस देऊन सहकार्य करावे सर्व ऊस गाळपास दिला पाहिजे. अधिक गाळप झाल्यास अधिक दर देण्यास मदत होते. त्यामुळे सभासद शेतकर्यांनी ही बाब विचारात घेतली पाहिजे. कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे. त्यामुळे कारखाना अडचणीतून बाहेर येण्यास मदत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.''
यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार, शहराध्यक्ष शकिल सय्यद, माऊली चवरे, मारुती वणवे उपस्थित होते.