शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सीएसआर निधीत कोटींचा गौडबंगाल

By admin | Published: April 21, 2017 6:12 AM

विविध कंपन्यांकडून आलेल्या कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीअंतर्गत शहरात विविध प्रकल्प सुरू आहेत. सीएसआर अंतर्गत आलेल्या

पुणे : विविध कंपन्यांकडून आलेल्या कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीअंतर्गत शहरात विविध प्रकल्प सुरू आहेत. सीएसआर अंतर्गत आलेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेत जमा न करता काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मर्जीने परस्पर खर्च केला जात आहे. प्रकल्पांवर किती निधी खर्च केला, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणावर, याबाबत कोणतीही ठोस माहिती प्रशासनाकडे नाही. कोट्यवधी रुपयांच्या सीएसआर निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँगे्रसच्या सदस्यांनी गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.महापालिकेच्या सीएसआर निधीबाबत अविनाश बागवे यांनी महापालिकेला लेखी प्रश्न विचारला होता. या प्रश्नांची उत्तरे देताना शहरामध्ये सीएसआर निधीअंतर्गत कचरा व्यवस्थापन, डिजिटल शाळा, स्वच्छतागृहे, पर्यटन आदी विषयांवर खर्च करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन असो की डिजिटल शाळा, स्वच्छतागृहे आदी गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च केला जात असताना पुन्हा याच कामांवर सीएसआर निधी का खर्च केला जातो, हा निधी खर्च केला जात असताना कोणत्याही स्वरूपाची निविदा न मागविता संबंधित उद्योजकांकडून हा निधी परस्पर संबंधित व्हेंडरला दिला जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आयुक्त कुणाल कुमार यांच्या एका पत्रावर कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोपदेखील बागवे यांनी केला. ज्या कंपन्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे, अशा कंपन्यांकडून ‘सीएसआर’ निधी मागितला जात असून, या कंपन्यांना एक प्रकारे अभयच दिले जात आहे. थकबाकी भरू शकत नाही, त्या कंपन्या सीएसआर कशा देऊ शकतात, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.शहरामध्ये आदर पूनावाला क्लिनसिटीमार्फत स्वच्छतेचे, इंडस टॉवरमार्फत ‘ती बस टॉयलेट’ काम केले जाते आहे. या एका बससाठी मे. सारा प्लास्टा इंडस्ट्रीजला तब्बल ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. वेंकीज कंपनीकडून सीएसआर अंतर्गत पेट बॉटल रिसायकलिंग युनिटचे काम केले जाते. या बदल्यात महापालिकेच्या शाळेतली मुलांसाठी वर्षाला कोट्यवधी रुपयांची अंडी खरेदी केली जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.