पुणे: पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या विकृतीची घृणास्पद प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी या ६५ वर्षाच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करणे, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा किळसवाणा प्रकार गेल्या ऑक्टोबरपासून सुरु असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मॉडेल कॉलनीमधील मिलेनियम सोसायटीमध्ये हा ६५ वर्षाचा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने रात्रपाळीची ड्यूटी करत असताना भटक्या कुत्र्याला पकडले. व त्याला बाजूला नेऊन त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार सुरु असताना तरुणीला जाग आली. तेव्हा तिने हा सर्व प्रकार पाहिला. तिने प्राणी मित्रांना फोन करुन त्यांची माहिती दिली. त्यांनी तिला या प्रकाराचे व्हिडिओ शुटिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ही तरुणी त्या सुरक्षा रक्षकावर लक्ष ठेवून होती. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या त्याने एका भटक्या कुत्र्याला उचलून पार्किंगमध्ये नेले. तेथे त्याने त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या तरुणीने त्याचे व्हिडिओ शुटिंग केले. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.